भुसावळात रविवारी सब-जुनियर गटाची टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी
भुसावळ : महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 18 वी 17 वर्षातील (सब-जुनियर) गटातील मुले/मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा जालना येथे 24 ते 26 जून 2022 दरम्यान होज आहे.
रविवारी होणार निवड चाचणी
या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी रविवार, 12 रोजी सकाळी 10.30 वाजता आरपीडी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डी.एस.) मैदान भुसावळला होणार आहे. 30 जून 2005 नंतर व जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल, रमण भोळे, प्रदीप साखरे, बी.एन.पाटील, मेघशाम शिंदे, गोपाल जोनवाल, प्रतीक कुलकर्णी, तन्मय दाभाडे, विकास पाटील, तारेख अहमद, राहुल कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.







