नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्यावर कठोर कारवाई करावी

भुसावळातील मुस्लीम समाज मंचची मागणी : सुन्नी जामा मशीद ट्रस्टचेही निवेदन


भुसावळ : ज्ञानवापी मशीद प्रकरणात भाजपा प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भुसावळ शहरातील सुन्नी जामा मशीद ट्रस्ट व शहरातील मुस्लीम समाज मंचतर्फे करण्यात आली. उभयंतांच्या अपमानास्पद वक्तव्यामुळे भारतातील मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल या दोघांनाही अटक करावी तसेच उभयंतांनी यापुढे पुन्हा असे आक्षेपार्ह वक्तव्य न करण्यासाठी उपाययोजना करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मुस्लीम मंचचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन
मुस्लीम समाज मंचने प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना दिलेल्या निवेदनावर अ.आरीफ भाई, अ‍ॅड.एहतेश्याम मलिक, साबीर शेख, पापा मेंबर, आशिक शेठ, अशरफ तडवी, फिरोज शेख, शोएब बागवान, मुजाहित खान, अ.सत्तार कुरेशी, सलीम गवळी, अकबर गवळी, युनूस मामा, युसूफ भांजा, हमीद शेख, सिकंदर खान, जुनेद खान, शे.मुस्ताक, निसार भाई, कलिम शेख, जॉनी गवळी आदींसह समाजबांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

सरकारने करावा कायदा
भविष्यात समाजातील अशा लोकांच्या भाषेवर अंकुश राहावा यासाठी सरकारने कायदा करावा, त्यामुळे देशात अशाप्रकारे सामाजिक तेढ निर्माण करण्यास कुणीही धजावणार नाही, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अशा निवेदनाची प्रत प्रांताधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना पाठवण्यात आली आहे. प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर अ‍ॅड.एहतेशाम खान, सय्यद आशिक शौकत, मौलाना मोहम्मद रेहान, मौलाना मोहम्मद सुलतान, मौलाना आशिक रझा, शेख वसीम नजीर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधान परीषदेची उमेदवारी : वरणगावात राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांचा जल्लोष










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !