उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर अज्ञाताकडून चाकू हल्ला


सांगली : सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर एकाने शुक्रवारी सकाळी चाकूने हल्ला केला. यात त्या किरकोळ जखमी झाल्या असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

अज्ञाताविरोधात गुन्हा
शुक्रवारी सकाळी सात वाजता विश्रामबाग परिसरातील नेमिनाथ ग्राउंडवर गेडाम या व्यायमासाठी गेल्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची छेड काढली. त्यामुळे गेडाम यांनी याचा जाब विचारला असता दोघांपैकी एकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र, मार्शल आर्टमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या गेडाम यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. त्यानंतर दोन संशयित पळून गेले. या हल्ल्यात गेडाम किरकोळ जखमी झाल्या असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !