धुळ्यातील अवैध सावकार राजेंद्र बंबच्या अडचणी वाढल्या : पोलिसांनी राज्यातून मागितली अचल संपत्तीची माहिती
धुळे : धुळ्यातील विमा एजंट तथा अवैध सावकारीमुळे राज्यात चर्चेत आलेल्या राजेंद्र बंबसोबत आता त्याचे कुटुंबीय चौकशीच्या रडारवर आले आहे. या कुटुंबाच्या नावे संपूर्ण महाराष्ट्रात कुठे व किती अचल संपत्ती आहे. याची माहिती धुळे आर्थिक गुन्हे शाखेने मागवली. त्यासाठी पुणे येथील शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
चोपडा आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात
आर्थिक गुन्हे शाखेने मागितली माहिती
विमा प्रतिनिधीच्या नावाने अवैध सावकारी करणार्या राजेंद्र बंब याच्या बँक लॉकरमध्ये कोट्यवधींची रोकड, दागिने व दस्तावेज मिळून आले आहे. सध्या राजेंद्र बंब हा पोलिस कोठडीत आहे परंतु अजूनही तो पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही. मुळ तक्रारीत राजेंद्र बंब याने आपल्या कुटुंबीयांच्या नावाने संपत्ती केली असल्याचा संशय व्यक्त केला होता. गेल्या दहा वर्षात राजेंद्र बंब याने कुटुंबीयांच्या नावाने संपत्ती घेतली आहे का याची माहितीही आर्थिक गुन्हे शाखेने मागवली आहे. त्यासाठी पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक यांना पत्र पाठविले आहे.
उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर अज्ञाताकडून चाकू हल्ला







