कोळवदला सट्टा जुगारावर धाड : एकास अटक


यावल : तालुक्यातील कोळवद गावात बस स्टँड जवळ टपरीच्या आडोशाला एक इसम अवैधरित्या सट्टा जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत एकास मुद्देमालासह अटक केली आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यात अवैध सट्टा जुगार चालवणार्‍या मध्ये खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
कोळवद, ता.यावल या गावात बस स्टँडच्या जवळ टपरीच्या आडोशाला एक इसम अवैधरित्या सट्टा जुगार घेतो अशी माहिती यावल पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांना मिळाली होती. तेव्हा त्यांनी या गुप्त माहितीची पडताळणी करिता पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, हवालदार संजय देवरे, राजेंद्र पवार या पथकाला गावात पाठवले व या पथकाने कोळवद गावातील मुख्य चौकात बस स्टँड जवळ टपरीच्या आडोशाला पडताळणी केली असता तेथे नथ्थु वसंत कोळी हा स्वतःच्या फायद्यासाठी सट्टा जुगारावर येणार्‍या अंक आकड्यावर बीट घेण्याचे काम करतांना आढळुन आला. तेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडून एक हजार 220 रुपयाची रोकड व सट्टा जुगार चालवण्याची साधने जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध अनिल साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !