यावल नगरपालिकेची सोमवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत
यावल : नगरपरीषदेच्या प्रभाग रचनेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता त्या-त्या प्रभाग निहाय अनुसूचित जाती-जमाती व महिलांसाठी ची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आरक्षण सोडत नगरपालिका कार्यालयात सोमवार, 13 जून रोजी काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजेपासून आरक्षण सोडतीला सुरुवात होईल तसेच या काढण्यात आलेल्या आरक्षणावर 15 ते 21 जून दरम्यान हरकती नोंदवता येणार आहे.
आरक्षण सोडतीकडे लागले लक्ष
यावल नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केली आहे व आता निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत तेव्हा शहरात नव्याने निर्माण झालेल्या 11 प्रभागातील 23 जागेसाठी चे आरक्षण काढले जाणार आहे. या सार्वत्रिक निवडणुकी साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित असून सदर असे आरक्षण सोमवार, 13 जून रोजी सकाळी 11 वाजता यावल नगरपरीषदेच्या सभागृहात काढले जाणार आहे तसेच या काढण्यात आलेल्या आरक्षणावर 15 जून ते 21 जून दरम्यान नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहे. तेव्हा या आरक्षण सोबतीसाठी सर्व राजकीय पदाधिकारी व नागरीकांनी नगरपालिकेत उपस्थित रहावे, असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे.







