जळगावातील मोबाईल चोरटा शनीपेठ पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : नेरी नाका स्मशानभूमीजवळ रीक्षात बसलेल्या व्यक्तीने तरुणाच्या खिश्यातील 20 हजारांचा मोबाईल चोरून नेणार्या संशयिताला शनीपेठ पोलिसांनी अटक केली. अरबाज शेख शकील (21, रा.उस्मानिया पार्क, जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
शनीपेठ पोलिसात गुन्हा
शहरातील नेरी नाका येथून रीक्षाने जात असलेल्या राकेश सुकदेव शेळके (24ग, चिंचोली, ता.जि.जळगाव) या तरुणाच्या खिश्यातील 20 हजार रूपये किंमतीचा मोबाईल रीक्षात बसलेल्या व्यक्तीने काढून घेत रीक्षा चालकाने स्मशानभूमीजवळ उतरवून दिले होते. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा उस्मानिया पार्क येथे असल्याची गोपनीय माहिती शनीपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईची सूचना केली. सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर, राहुल पाटील यांनी कारवाई करत संशयीत आरोपी अरबाज शेख शकील (21, उस्मानिया पार्क, जळगाव) याला शुक्रवार, 10 जून रोजी दुपारी दोन वाजता अटक केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहे.
डांभूर्णी शेत शिवारातून विद्युत तारांची चोरी







