धान्यापासून वंचित कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी अन्न व पुरवठा मंत्र्यांना साकडे


रावेर : रावेर तालुक्यातील धान्यापासून वंचित कुटुंबाना धान्य साठा वाढवुन देण्याची मागणी अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेमूद शेख यांनी केली आहे.

लाभार्थी शासनाच्या धान्यापासून वंचित
रावेर शहरासह तालुक्यात गरीब कुटुंबाना रेशन दुकानांद्वारे धान्य वाटप केले जाते मात्र लाभार्थींना अधिक धान्यसाठा वाढवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करण्यात आली. निवेदनाचा आशय असा की, स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणार्‍या अन्नधान्याबाबत अधिकारी, कर्मचारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, वरुनच धान्य कमी येते, त्यावर आम्ही वरीष्ठ पातळीवर तपास केला असता धान्याचा पुरवठा 2013 च्या शासन निर्णयाप्रमाणे रेशन दुकानदारांना केला जातो परंतु 2013 ते 2022 या काळात रावेर तालुक्यातील गावांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे लाभार्थीची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच गरीब कुटुंबाकडे रेशन कार्ड असल्यावर सुध्दा शासनाच्या धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. वंचित गरीब कुटुंबांसाठी रावेर तालुक्याचा धान्य साठा वाढवून देण्याची मागणी अन्न पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !