सोशल मिडीयावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून अकलकुव्यात तुफान दगडफेक : 15 आरोपींना अटक
अक्कलकुवा : सोशली मिडीयावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर झालेल्या वादातून अक्कलकुवा शुक्रवारी रात्री तुफान दगडफेक करण्यात आल्याने दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले होते. झेंडा चौक, बाजारपेठ, तळोदा नाका, मरीमाता मंदिर परीसरात मोठे नुकसान झाले असून दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी 15 आरोपींना अटक करण्यात आली.
तणावपूर्ण शांतता
अक्कलकुवा शहरात सध्या तणावपुर्ण शांतता असून पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी अक्कलकुव्यात दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनाकडून आरोपींचा शोध सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील रतळ ठोकून आहेत. दरम्यान या प्रकरणी 15 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कायदा तोडणार्यांवर कठोर कारवाई
जिल्ह्यात कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. कायदा तोडणार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देत नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.







