एरंडोलमध्ये सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट : तरुणाविरोधात गुन्हा


Offensive post on social media in Erandol : Crime against youth एरंडोल : सोशल मिडीयावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकून एका समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी एरंडोल शहरातील मंगेश विलास भोई (26, भोई गल्ली, एरंडोल) या तरुणाला एरंडोल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शहरात पोलिसांनी काटेकोर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

आक्षेपार्ह पोस्टमुळे वातावरण संतप्त
फेसबुक अकाउंटवर आरोपी मंगेश भोई याने एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील या आशयाचा मजकूर प्रसारीत केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने मोठ्या प्रमाणावर जमाव पोलिस ठाण्याबाहेर जमला व आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, शहरातील तणावाची स्थिती पाहता बाहेरील जिल्ह्यातील पोलिस कुमक बोलावण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून अकलकुव्यात तुफान दगडफेक : 15 आरोपींना अटक










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !