गायक स्व.प्रतापसिंग बोदडे यांना आज मुक्ताईनगरात अभिवादन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथील सुप्रसिद्ध प्रबोधनकार, गीतकार, कवी तथा ख्यातनाम गायक स्व.प्रतापसिंग बोदडे यांचे नुकतेच देहावसान झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रीपाइंने (आठवले गट) मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात रविवार, 12 रोजी सायंकाळी सहा वाजता अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मुक्ताईनगरात आज अभिवादन सभा
वामनदादा कर्डक यांचे शिष्य असलेले प्रतापसिंग बोदडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी रीपाइं व परीवर्तन कला महासंघ महाराष्ट्र राज्याने जाहीर अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, खान्देश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव, युवक जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे यांनी पुढाकार घेतला आहे. अभिवादन सभेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, परीवर्तन कला महासंघाचे कार्याध्यक्ष साहेबराव सुरवाडे, महाराष्ट्रातील नामांकित गायक, कवी, शाहीर, कव्वाल यांच्या गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !