जामनेरच्या तरुणाने कर्जफेड केल्यानंतर ब्लॅकमेलिंग : 54 हजार रुपयेही लाटले


जळगाव : मोबाईल अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून घेतलेले ऑनलाईन काढलेले कर्ज व व्याज देवूनही पुन्हा पैश्यांची मागणी करत तरूणाच्या नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठवून 53 हजार 593 रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव सायबर पोलिसात गुन्हा
जामनेर शहरातील 28 वर्षीय तरुण हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याने ऑनलाईन सेवा केंद्राचे दुकान असून त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो. 29 मार्च 2022 ते 8 जून 2022 दरम्यान तरुणाने कॅश अ‍ॅडव्हान्स नावाच्या मोबाईल अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून वेळोवेळी दोन लाख 29 हजार 94 हजाराचे ऑनलाईन लोन घेतले. तरुणाने लोन घेतले परंतू सर्व्हीस चार्ज म्हणून 88 हजार 810 रुपये कापून घेण्यात आले व उर्वरीत एक लाख 40 हजार 254 रुपये खात्यात जमा झाले. समोरील अज्ञात मोबाईल धारकांनी सात दिवसाच्या आत पैश्यांची मागणी केली. त्यानुसार तरुणाने एक लाख 40 हजार 254 रुपये आणि कर्जाच्या रकमेवरील व्याज 53 हजार 564 रुपये असे एकूण एक लाख 93 हजार 818 रुपये परत केले.

नातेवाईकांना अश्लील मेसेज पाठवत ब्लॅकमेलिंग
दरम्यान अज्ञात व्यक्तींनी अजून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबियांची बदनामी करू, अशी धमकी दिली तसेच तरुणाच्या मोबाईलचा डाटा चोरून तरूणासह नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठवून खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तरुणाने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरुणाच्या तक्रारीवरून शनिवार, 11 जून रोजी दुपारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

पाचोरा तालुक्यातील महिलेवर अमानुष अत्याचार : व्हिडिओही बनवला










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !