शिबिरात नागरीकांच्या समस्यांचे तत्काळ निवारण : समाधान महाजन
प्रभाग आठमध्ये प्रा. धीरज पाटील यांच्या माध्यमातून 56 कुटुंबांना शिधापत्रिका वाटप
भुसावळ : सर्वसामान्य नागरीकांच्या विविध समस्यांचे निंराकरण करण्यासाठी शिवसेनेमार्फत आयोजित केलेले शिबिर आशेचा किरण ठरला असून हा उपक्रम सुरू झाल्यापासून नागरीकांच्या समस्यांचे तत्काळ निवारण होत आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले. भुसावळ शहरातील शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व प्रा.सीमा पाटील यांनी आयोजित केलेल्या रेशनकार्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
56 कुटुंबांना शिधापत्रिकांचे वाटप
शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील गणेश कॉलनी, भोई नगर, श्री नगर, मोहित नगर, भिरूड कॉलनी, जुनी हुडको कॉलनी, अयोध्या नगर, नारायण नगर भागातील 56 कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. या शिबिरात केशरी शिधापत्रिका धारकांना 12 अंकी क्रमांक मिळवून देणे, नवीन शिधापत्रिका तयार करून देणे, जीर्ण शिधापत्रिका बदलुन देणे, नाव कमी करणे, नवीन नावाचा समावेश करणे आदी कामे करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, महिला आघाडीच्या तालुका संघटक भुराबाई चव्हाण, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, शहरप्रमुख निलेश महाजन, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, संदीप भोई, नमा शर्मा, विभागप्रमुख अमोल पाटील, भारती गोसावी, विक्की चव्हाण, योगेश कोळी, गिरीश राणे, राजेश पाटील, हर्षल पाटील, शशिकांत दुसाने, पंकज इंगळे उपस्थित होते.
शिधापत्रिकासंबंधी तक्रारीसाठी संपर्क साधा
अनेकदा नागरिकांना रेशनकार्ड मिळवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या मदतीने शिबिराचे आयोजन केले होते. शिबिर घेतल्याने शिधापत्रकांबाबत अडचणींची तात्काळ सोडवणूक होत आहे. या शिबिरांतून 56 लाभार्थींना शिधापत्रिकांचे वाटप केले आहे. नागरीकांनी शिधापत्रिकासंबंधी तक्रारीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केले आहे.







