दीपक धांडे मित्र परीवारातर्फे भगवा सप्ताहाचे आयोजन
भुसावळ: महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 12 जून रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्ताने दीपक धांडे मित्र परीवारातर्फे भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात 12 जूनपासून ते 19 जून रोजी असलेला शिवसेना वर्धापनदिनापर्यंत हा भगवा सप्ताह चालणार आहे.
लाभार्थींना मिळणार रेशनकार्ड
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने व नाशिक विभागाचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत, मिर्लेकर यांच्या प्रेरणेने तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्या सहकार्याने या भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. भगव्या सप्तह अंतर्गत केशरी रेशन कार्ड असलेल्या ज्या लाभार्थींकडे 12 अंकी नंबर नसल्याने त्यांना रेशन (धान्य) मिळत नाही अशा केशरी कार्ड धारकांनी 12 अंकी नंबर मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून दीपक धांडे मित्र परीवारातर्फे नंबर आणि धान्य मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. हा उपक्रम भुसावळ शहरातील वॉर्ड क्रमांक आठमधील रहिवाश्यांसाठी खास करून राबविला जात आहे.
संपर्क साधण्याचे आवाहन
ज्यांना या उपक्रमाचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी या कामी आवश्यक असलेले रेशन कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड मध्ये नमूद असलेल्या परीवारातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, हमी पत्र या कागदपत्रांची पूर्तता करुन शिवसेना संपर्क कार्यालय, जुना सातारा येथे 13 जून ते 19 जून पर्यंत संपर्क साधावा आहे, असे आवाहन शिवसेनेचे दीपक धांडे, माजी नगरसेविका शारदा दीपक धांडे, देवेंद्र पाटील, प्रसिध्दी प्रमुख गोकुळ बाविस्कर, माजी नगरसेवक नरेंद्र लोखंडे, उपशहर प्रमुख स्वप्नील सावळे, उप शहरप्रमुख राकेश खरारे, विभाग प्रमुख अमोल पाटील, शाखा प्रमुख पिंटू भोई, चेतन भोई, दिगंबर धनगर, गणेश कल्याणकर, कल्पेश सोनावणे यांनी केले आहे.
रावेर परीसरात अवैध वाळू चोरट्यांचा उच्छाद







