राज्यसभेतील यशानंतर वरणगावसह फैजपूरात जल्लोष

भाजपा पदाधिकार्‍यांच्या विजयाच्या घोषणा : उपस्थितांना लाडूचे वाटप : पदाधिकार्‍यांची आघाडीवर टिका


भुसावळ : राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे तसेच धनंजय महाडीक निवडून आल्यानंतर वरणगावसह फैजपूर, ता.यावल येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी फटाक्यांची आतषबाजी करून तसेच लाडू वाटप करून जल्लोष केला. यावेळी भाजपाच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्यानंतर परीसर दणाणला.

फैजपूरात भाजपा पदाधिकार्‍यांचा जल्लोष
फैजपूर : भाजपा उमेदवारांच्या विजयानंतर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस चौक, फैजपूर येथे फटाक्यांची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी फैजपूर शहराध्यक्ष अनंता नेहते, बी.के.चौधरी, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, पिंटू निलेश राणे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे, ओ.बी.सी.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पिंटू तेली, अनिरुद्ध सरोदे, यावल तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, कोषाध्यक्ष रघुनाथ कुंभार, भाजपा युवा मोर्चा यावल तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे, प्रतीक वारके, संदीप भारंबे, किरण चौधरी, राजाभाऊ चौधरी, राजेश महाजन, वसंत परदेशी, जितेंद्र वर्मा, संजय भावसार, नरेंद्र चौधरी, आदिवासी मोर्चा शाखाध्यक्ष रशीद तडवी, युवा मोर्चा शाखाध्यक्ष श्याम भंगाळे, अक्षय परदेशी, झील परदेशी, भारतीय जनता पार्टी फैजपूर शहर व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

वरणगावात फटाके फोडून लाडू वाटून स्वागत
वरणगाव : भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून आल्यानंतर विजयाचा जल्लोष शनिवारी वरणगाव बसस्थानक भागात फटाके फोडून व लाडू वाटून करण्यात आला. देवेंद्र फडणीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, गिरीश भाऊ, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ ह,ै भारतीय जनता पार्टीचा विजय असो, दस तारीख झाकी है , 30 तारीख बाकी है, अशा घोषणांनी परीसर दणाणला. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली.

यांची होती उपस्थिती
वरणगावातील कार्यक्रमास शेख अक्षय दिसू, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमो शहराध्यक्ष आकाश निमकर, महिला आघाडी शहराध्यक्षा प्रणिता चौधरी-पाटील, शहर सरचिटणीस योगेश माळी, अल्पसंख्यांक अध्यक्ष डी.के.खाटीक, ज्येष्ठ नेते मनोहर सराफ, रामभाऊ माळी, जिल्हा चिटणीस गजानन वंजारी, शामराव धनगर, गजानन वाघ, अलीम खान, कामगार कामगार नेते मिलिंद मेढे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, रमेश पालवे, दीपक चौधरी, बळीराम सोनवणे, बाळा धनगर, कैलास पाटील, श्याम सुरळकर, संदीप माळी, कृष्णा माळी, दगडू माळी, ज्ञानेश्वर घाटोळे, संगीता माळी, ज्येष्ठ नेते दीपक चौधरी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ सदस्य शामराव धनगर यांनी आघाडीवर टीका केली.

युपीतील तरुणाचा चाळीसगावनजीक रेल्वेतून पडल्याने मृत्यू










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !