भुसावळात गावठी कट्ट्यासह दोघे जाळ्यात
चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा : बाजारपेठ व एलसीबी पथकाची कारवाई
भुसावळ : संघटित गुन्हेगारी टोळीची दहशत टिकवून ठेवण्यासाठी चौघे गावठी कट्ट्यांच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेसह बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर संयुक्त कारवाईत दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर एक संशयीत पसार झाला. या प्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
अक्षय प्रताप न्हावकर उर्फ थापा (24) व रीतीक नरेश चौधरी (23) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर निलेश ठाकूर हा पोलिसांना पाहताच पसार झाला शिवाय अटकेतील आरोपींनी गावठी कट्टा निखील राजपूतने दिल्याची कबुली दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.