दारूच्या व्यसनामुळे त्याने चक्क चोरल्या दुचाकी


जळगाव गुन्हे शाखेने आवळल्या आरोपीच्या मुसक्या

जळगाव : दारूच्या व्यसनामुळे मध्यप्रदेशातील आरोपीने चक्क तीन दुचाकी चोरल्या तर अल्प किंमतीत ही वाहने विक्री झाल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर आरोपीच्या रविवारी मुसक्या आवळण्यात आल्या. सुनील महादू ब्राम्हणे (31, रा. केरमला, ता. वरला, जि. बडवणी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने गेल्या वर्षभरात चोपडा शहरातून दोन व अमळनेर येथून एक अशा तीन दुचाकी चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

पत्नी विभक्त झाल्याने जडले दारूचे व्यसन
अटकेतील आरोपी सुनीलला तीन अपत्य असून पत्नी त्याच्यापासून विभक्त झाल्याने त्याला दारूचे व्यसन जडले व व्यसनापायीच त्याने वाहने चोरल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. दरम्यारन, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे यांच्या पथकाने आरोपीला अटककरीत चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.


कॉपी करू नका.