यावलच्या शेतकी संघात हमालाचा मृत्यू


यावल : शहरातील सुतार वाड्यातील रहिवासी व हमाली करून उदरनिर्वाह करणार्‍या ज्ञानेश्वर सुकलाल कोळी (49, सुतारवाडा, यावल) यांना अचानक रक्ताची उलटी झाली व त्यानंतर त्यांचा मृत्यू ओढवला. ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हमालाच्या मृत्यूने हळहळ
शहरातील शेतकरी खरेदी विक्री संघाच्या आवारात मंगळवारी वडाच्या झाडाखाली हमाली काम करून उदरनिर्वाह करणारे ज्ञानेश्वर सुकलाल कोळी हे बसले असताना मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांना रक्ताची उलटी झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार येथील कर्मचार्‍यांनी पाहिल्यावर कोळी यांच्या कुटुंबास व पोलिसांना माहिती देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात योगेश कोळी यांच्या खबरीवर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार असलम खान करीत आहे.

राजकारणातील भीष्म पितामहची एक्झीट चटका लावणारी

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !