इच्छापूर शेत-शिवारातून इलेक्ट्रिक मोटर आणि केबलची चोरी
मुक्ताईनगर : तालुक्यातील इच्छापूर शेत-शिवारातील शेतकर्याच्या शेतातील नव्यानेच विहिरीत टाकलेली इलेक्ट्रिक मोटर व केबल चोरट्यांनी लांबवली. ही घटना शुक्रवार, 10 जून रोजी रात्री घडली. या प्रकरणी शेतकरी सचिन वसंत भडांगे यांनी कुर्हा पोलिसात तक्रार नोंदवली आहे. विशेष म्हणजे मोटार व केबल चोरून नेल्यानंतरही पाईप लाईनचेदेखील मोठे नुकसान चोरट्यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून शेतकर्यांच्या शेतातील केबल आणि मोटार चोरीस जाण्याच्या घटना वारंवार घडत असून पोलिस तपास मात्र लागत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आधीच पाणी व नैसर्गिक आपत्तीमुळे हताश झालेल्या शेतकर्यांवर या घटनांमुळे गंभीर प्रसंग ओढवत आहेत.