शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने भुसावळात उद्यापासून तीन दिवस समाजोपयोगी कार्यक्रम
भुसावळ : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने भुसावळ शहरात शुक्रवारपासून तीन दिवस समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
वृक्षारोपणासह साहित्य वाटप
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रेल्वे स्टेशनजवळील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ वृक्षारोपण होईल तर शनिवारी सकाळी 11 वाजता शिवभोजन संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांच्या वतीने भगीरथ प्राथमिक शाळा सोनिच्छावाडी येथे शंभर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप होईल तसेच रविवारी सायंकाळी 5पाच वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात माजी जिल्हाप्रमुख स्व.राजेंद्रजी दायमा यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी सर्व अधिकृत संघटना व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.