पिंप्राळ्यातील दहावीच्या विद्यार्थ्याचा पूर्णा नदीत बुडाल्याने मृत्यू


कुर्‍हा : येथून जवळच असलेल्या पिंप्राळा येथील दहावीचा विद्यार्थी वैभव विजय झाल्टे (16) याचा पूर्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

नदीपात्रात पोहण्यासाठी गेल्यानंतर दुर्घटना
मंगळवारी शेतकरी विजय झाल्टे आपल्या शेतात नांगरटी करीत होते तर दुपारी तीन साडेतीन वाजेपर्यंत वैभव घरीच होता मात्र वैभव आणि त्याचा मित्र शेतात ट्रॅक्टरने नांगरटी सुरू असल्याने शेतात आले मात्र घरी न जाता त्यांनी काही अंतरावरील पूर्णा पात्रा गाठले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने वैभव पाण्यात बुडाला व त्याच्या मित्राला प्रयत्न करूनही त्यास बाहेर काढता न आल्याने वैभवचा बुडून मृत्यू झाला.

एकही घरात पेटल्या नाहीत चुली
वैभव हा शिवाजी हायस्कूल, कुर्‍हा या शाळेचा विद्यार्थी होता. शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून त्याची गणना होत होती. यावर्षी त्याने दहावीचे पेपर दिले होते व शुक्रवारी निकालही जाहीर होणार होता मात्र तत्पूर्वीच अकाली झाल्याने मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, वैभवच्या मृत्यूनंतर मंगळवारी संध्याकाळी एकाही घरी चुल पेटली नाही. वैभव हा पिंप्राळा गावचे माजी पोलीस पाटील स्व.रघुनाथ पाटील यांचा नातू तर माजी सरपंच विष्णू झाल्टे यांचा पुतण्या होय.

साक्री तालुक्यात ऑनरकिलींग : भावानेच केली बहिणीची हत्या 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !