घोटावडेतील अजित पवारांच्या फार्म हाऊसला आग


पुणे : हिंजवडी आयटी पार्कच्या जवळील घोटावडे ते मुलखेड रस्त्यावरील मुळा नदीकाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे फार्म हाऊस असून या फार्म हाऊसला रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवानेआगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझवण्यासाठी हिंजवडी आयटी पार्कमधून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. दरम्यान, फार्म हाऊसमधल्या काही जागेचा वाद काही दिवस न्यायालयातही सुरू असल्याची माहिती मिळाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !