भुसावळातील नगरसेवक अपात्रताप्रकरणी जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे आज सुनावणी

निकालाकडे लागले राजकीय मातब्बरांचे लक्ष : हरकत निघाली निघाली


भुसावळ : पालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी, पालिकेची मुदत संपण्यापूर्वी 17 डिसेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रकरणी 29 डिसेंबरला भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळेंसह, 11 जणांविरुध्द अपात्रता याचिका दाखल केली होती. पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर याचिका दाखल झाल्याने ती रद्द करावी, अशी हरकत या याचिकेवर संबंधित नगरसेवकांनी घेतली होती. ही हरकत जिल्हाधिकार्‍यांनी निकाली काढून शुक्रवारी पुढील तारीख दिली आहे.

या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पालिकेच्या 2016 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेले तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे ( प्रभाग 1 – ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब), मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अ‍ॅड. बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते ( 22 ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) यांनी 17 डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नगरसेवक पदाचा किंवा पक्षाचा राजीनामा न देता पालिकेची मुदत संपण्यापूर्वी या नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात, तत्कालीन नगरसेविका पुष्पा बतरा यांनी 29 डिसेंबरला अपात्रता याचिका दाखल केली होती.

अर्ज फेटाळल्याने न्यायाची खात्री
अपात्रता प्रकरणी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांनी याचिकेवर हरकत घेतली होती. मुदतीनंतर याचिका दाखल केली, यामुळे ती रद्द करावी अशी त्यांची मागणी होती. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी हरकत अर्ज फेटाळला आहे. आता मूळ याचिकेवर लवकरच गुणदोषावर पुढील निर्णय होईल. पुढील सहा वर्षांसाठी संबंधीत नगरसेवक अपात्र होतील, आम्हाला न्याय मिळेल याची खात्री असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड.राजेंद्र राय म्हणाले.

किनगावात दोन गटात तुफान हाणामारी : दोन्ही गटातील चार जण जखमी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !