भाजपाच्या आंदोलन इशार्‍यानंतर नरमले प्रशासन : नशिराबाद टोल नाक्यावर मिळणार महिनाभरात केव्हाही पास


Administration Softened After BJP’s Agitation Signal : Nasirabad Toll Plaza Will Get Pass anytime Within a Month भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्यावर दरमहा 1 ते 10 तारखेपर्यंतच पास काढता येईल, नंतर पास मिळणार नाही, असा अजब निर्णय टोल प्रशासनाने घेतल्यानंतर मनमानी निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी शुक्रवारी आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली टोलनाका बंद आंदोलन केले जाणार होते मात्र टोलनाका प्रशासनाने निर्णय मागे घेतला असून आता महिन्यातील कोणत्याही तारखेला पास मिळणार असल्याने आंदोलन रद्द करण्यात आल्याचे आमदार सावकारे यांनी सांगितले.

पत्नीने माहेरून येण्यास नकार दिल्याने भुसावळात युवकाची आत्महत्या

आंदोलन इशार्‍यानंतर मागे घेतला निर्णय
ज्या तारखेला पास काढला त्या तारखेपासून पुढील महिनाभर पासची मुदत ठेवावी, अशी मागणी होती मात्र, टोल नाक्यावरील व्यवस्थापनाने दरमहा 1 ते 10 तारखेपर्यंतच पास काढता येईल, असा फलक लावला होता तसेच वाहनधारकांची लूट सुरू केल्याच्या तक्रारी अनेक वाहनधारकांनी आमदार संजय सावकारे यांच्याकडे केल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी आणि महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र तांत्रिक कारण पुढे केले जात असल्याने, आमदारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे टोलनाका व्यवस्थापनाने मागणी मान्य केल्याने आंंदोलन रद्द करण्यात आले, अशी माहिती आमदार सावकारें यांनी दिली आहे.

भुसावळातील नगरसेवक अपात्रताप्रकरणी जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे आज सुनावणी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !