भुसावळात नदीपात्रात अनोळखीचा मृतदेह आढळला


भुसावळ : भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात 35 ते 40 वयोगटातील अनोळखी इसमाचा मृतदेह गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास आढळला. मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. मयताने तापी पात्रात आत्महत्या केली की अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला ही बाब ओळख पटल्यानंतर स्पष्ट होणार आहे. शहर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पिंप्राळ्यातील दहावीच्या विद्यार्थ्याचा पूर्णा नदीत बुडाल्याने मृत्यू 

शहर पोलिसांची धाव
तापी नदीपात्रातील जुगा देवी परीसरातील किनार्‍यावर अनोळखीचा मृतदेह असल्याची माहिती शहर पोलिसांना कळाल्यानंतर गुरुवारी दुपारी शहरचे पोलिस निरीक्षक गजानन पडघाण, सहाय्यक निरीक्षक संदीप दुणगहू, पोलिस नाईक सोपान, एएसआय संजय कंखरे, कॉन्स्टेबल संजय ढाकणे आदींनी धाव घेतली. पोहणार्‍यांच्या मदतीने अनोळखीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. मयत तीन ते चार दिवसांपासून पाण्यात बुडाल्याने संपूर्ण शरीर फुगले होते व दुर्गंधीही सुटली होती. मयताच्या अंगात हाफ लायनिंगचे शर्ट व काळ्या रंगाची पँट व बेल्ट आहे शिवाय काही अंतरावर हिरव्या रंगाच्या चपलाही आढळल्या आहेत. या प्रकरणी शहर पोलिसात माजी नगरसेवक किरण कोलते यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटत असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

भाजपाच्या आंदोलन इशार्‍यानंतर नरमले प्रशासन : नशिराबाद टोल नाक्यावर मिळणार महिनाभरात केव्हाही पास


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !