रावेर तालुक्यातील केळीचे नुकसान : आमदार राजूमामा भोळेंनी केली पाहणी


रावेर : रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे महिनाभरात तिसर्‍यांदा केळी पिकाचे नुकसान झाले होते. केळी उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने रावेर तालुक्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार राजूमामा भोळे यांनी पाहणी करीत शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाखांची भरपाई द्यावी तसेच पीक विमा कंपनीने शेतकर्‍यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांनी केली.

यांची होती उपस्थिती
वादळी पावसामुळे रावेर तालुक्यात केळीचे नुकसान झाल्यानंतर त्या भागाची पाहणी आमदार ाजूमामा भोळे यांनी केली. त्यांनी पातोंडी पुनखेडा परीसरात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा किसान सभेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश धनके, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समितीचे माजी पी.के.महाजन, हरलाल कोळी, संदीप सावळे, प्रल्हाद पाटील आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

दहावी निकालात कोकण विभागच अव्वल : राज्याचा निकाल 96.94 टक्के


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !