रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा स्वाभिमानीचे टोलबंद आंदोलन

राजमार्ग अंतर्गत मुक्ताईनगर सर्व्हिस रोडवर खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त


मुक्ताईनगर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्र.53 अंतर्गत मुक्ताईनगर शहरालगत च्या सर्विस रोडवर मागील तीन महिन्यांपासून मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यांमुळे सर्व्हिस रोडवरून जा-ये करणार्‍या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तातडीने या बाबीची दखल घेवून दुरुस्ती करावी अन्यथा टोल नाका बंद करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

मोठा अपघात घडण्याची भीती
रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळीच मोठी दुर्घटना होऊन जीवितहानीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोडवरील खड्ड्यांची देखभाल दुरूस्ती राजमार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारांकडून तात्काळ दुरूस्त करणे अपेक्षित होते मात्र कंत्राटदाराकडून रोडच्या देखभाल दुरुस्तीकडे हेतूपुरस्कार कानाडोळा केला जात आहे? असा आरोप स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी केला आहे. शासनाच्या निविदा अटी- शर्तीना राजमार्ग प्राधिकरणाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. प्रकल्प संचालकही ठेकेदाराला पाठिशी घालत आहेत ? असा आरोप आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजमार्गावरील मुक्ताईनगर शहरालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील जीवघेणा खड्डा तत्काळ दुरूस्त न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने टोल बंद आंदोलन छेडण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकल्प संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दहावी निकालात कोकण विभागच अव्वल : राज्याचा निकाल 96.94 टक्के


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !