भुसावळात शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम
युवा सेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
भुसावळ : युवा सेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळ तालुका आणि भुसावळ शहराच्या शिवसेनेच्या वतीने नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. भुसावळातील शिवभोजन केंद्राचे संचालक व कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा यांच्या माध्यमातून या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
झाडे लावण्यासह ती जगण्यावरही भर : प्रा.उत्तम सुरवाडे
पर्यावरणाच्या क्षेत्रांमध्ये आदित्य साहेब ठाकरे यांच्या कामाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. पर्यावरण दिनाच्या दृष्टिकोनातून झाडे लावणे आणि जगवणं अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. झाडे लावण्याची मोहिम केवळ फोटो पुरती मर्यादित न राहता खर्या अर्थानं ती वास्तवात आली पाहिजे, झाडे जगली पाहिजे, वाचली पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आगामी काळामध्ये सबंध भुसावळ तालुक्यातून या मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळेल, असे प्रतिपादन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे यांनी यावेळी केले. 13 जून 2022 पासून 19 जून 2022 शिवसेनेच्या वर्धापनदिनापर्यंत शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपणाची मोहीम सुरू राहणार आहे, असे शिवभोजन केंद्राचे संचालक नमा शर्मा यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी माजी उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, हेमंत खंबायत, उपशहरप्रमुख राकेश खरारे, विभागप्रमुख अरुण साळुंखे, गोलू कापडे, अमोल पाटील उपस्थित होते.