भुसावळातील डॉ.नितीन पाटील मृत्यू प्रकरण : फॉरेन्सीक अहवालाकडे लागले लक्ष

मृत डॉक्टरांवर भुसावळात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार


भुसावळ : शहरातील श्री रीदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन रामचंद्र पाटील (36, रा.मोहित नगर, भुसावळ) यांचे गुरुवारी सकाळी अज्ञात कारणाने निधन झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. डॉक्टरांच्या मृत्यूचे ठोस कारण कळू न शकल्याने विविध चर्चादेखील सुरू होत्या मात्र कुटुंबियांनी पोलिस प्रशासनाकडे मृतदेहाचे फॉरेन्सिक शवविच्छेदन करावे, अशी मागणी केल्यानंतर पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला पत्र दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी फॉरेन्सिक शवविच्छेदन करण्यात आले व नंतर कुटुंबियांना मृतदेह सोपवण्यात आल्यानंतर सायंकाळी पाच वाजता भुसावळातील तापी नदीकाठी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, फॉरेन्सिक अहवालाअंती मृत्यूचे ठोस कारण कळणार असल्याने त्यानंतर पोलिसांची कारवाईची दिशा ठरणार आहे.

साक्री तालुका खुनाने हादरला : हट्टी शिवारात मेंढपाळ तरुणाचा गळा आवळून खून 

घरातच आढळला होता मृतदेह
डॉ.नितीन पाटील हे रीदयम रुग्णालयात न आल्याने गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांना मोबाईल लावण्यात आला मात्र त्यानंतरही मोबाईलला प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचार्‍यांनी मोहित नगरातील डॉक्टरांचे घर गाठले मात्र दरवाजा ठोठावूनही डॉक्टर प्रतिसाद देत नसल्याने नागरीकांच्या उपस्थितीत दरवाजा तोडण्यात आल्यानंतर डॉक्टर बेडखाली मृतावस्थेत आढळले होते. डॉक्टर यांना मिरगीचा आजार असल्याने त्यामुळे पडल्याने त्यांचा मृत्यू झाला की काही झोपेसाठी काही औषधी घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला ? याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र कुटुंबियांनी स्थानिक स्तरावर शवविच्छेदन करण्याऐवजी मृत्यूचे ठोस कारण समोर येण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याशी चर्चा करून फॉरेन्सिक शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती व त्यानुषंगाने पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला होता.

अहवालानंतर ठरणार कारवाईची दिशा
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने मृतदेहाचे फॉरेन्सिक शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांकडे शुक्रवारी दुपारी मृतदेह सोपवल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तापी नदीकाठच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, कुटुंबियांनी फॉरेन्सिक शवविच्छेदन करण्याबाबत पत्र दिल्यानंतर जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल व त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल.

यावल तहसीलदारांसह तिघांचा एसीबीने नोंदवला जवाब


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !