धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरण : राजेंद्र बंबविरोधात सहावा गुन्हा


Illegal Lending case in Dhule : Sixth Case against Rajendra Bomb धुळे : धुळ्यातील अवैध सावकार राजेंद्र बंब विरोधात देवपूर पेालिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून हा सहावा गुन्हा आहे.कर्जदारांच्या नावे केलेल्या बनावट एफडी या अशाच एका कर्जदाराच्या नावाने लॉकरमध्ये ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.

आतापर्यंत सहा गुन्हे दाखल
राजेंद्र बंब याच्यावर दाखल झालेला हा सहावा गुन्हा आहे. देवपुरातील भोई सोसायटीतील रहिवाशी तथा व्यावसायिक राजेंंद्र मधुकर पाटील (50) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार 2016 मध्ये राजेंद्र जीवनलाल बंब याच्याकडून कर्ज घेतले होते. पॉलिसी काढल्यानंतर प्लॉटची कागदपत्रे राजेंंद्र बंबने ठेवून घेतली. वर्षभरात व्याजासह कर्जाची परतफेड केली. यानंतर व्यावसायिक कारणाने पुन्हा कर्ज घेतले. त्यासाठी शिरपूर तालुक्यातील शिंगावे शिवारात असलेल्या बखळ प्लॉटची कागदपत्रे बंब याने घेतली होती. राजेंद्र पाटील यांच्या याच कागदपत्रांचा आधार घेत राजेंद्र बंब याने योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत लॉकर उघडले. त्यावर राजेंद्र पाटील यांच्या नावाने स्वत: बंब यानेच खोट्या सह्या करुन त्या खर्‍या असल्याचे दर्शवले. शिवाय या लॉकरचा उपयोग स्वत:साठी केला. तसेच कोणताही परवाना नसताना अवैध सावकारीच्या माध्यमातून बंब याने आर्थिक शोषण केले, अशी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला.

न्यायालयाने जामीन पुन्हा फेटाळला
आर्थिक शोषण झालेल्या इतरांप्रमाणे विलास ताकटे यांनी धुळे शहर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दिली होती. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी बंबने धुळे न्यायालयात अर्ज दिला होता. हा अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावल्याने या गुन्ह्यातही बंब याच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

जळगावातील सेवानिवृत्ताला स्टार हेल्थ पॉलिसीच्या नावाने 62 लाखांचा गंडा : सात आरोपी जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !