अनैतिक संबंधाचा संशय : ‘लिव्ह इन’मध्ये राहणार्या महिलेसह दोन मुलांचा खून
सातारा जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड : आरोपीला अटक
सातारा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाने सोबत राहणार्या (लिव्ह इन) महिलेसह दोन मुलांचा गळा दाबून खून केला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव वेलंग शिरंबे येथे ही घटना गुरुवारी उघडकीस आली. पोलिसांनी दत्ता नारायण नामदास (मूळ रा. राजेबोरगाव, ता. जि. उस्मानाबाद; सध्या रा. वेलंग (शिरंबे) जि. सातारा) याला अटक केली आहे.
दुसर्याशी संबंध असल्याच्या संशयातून केला खून
दत्तासोबत योगिता दत्ता नामदास (38) दोन मुलांसह राहत होती. तिचे दुसर्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने योगिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर योगिताच्या तनू व समीर या दोन्ही मुलांना झोपेतून उठवले आणि मळ्यातील विहिरीत ढकलून दिले. तिघांचे खून करून घराला कडी लावून तो निघून गेला. अकलूज पोलिसांनी दत्ताला त्याच्या मूळ गावात अटक केली.