खानापूरातून 74 हजारांचा डिंक लांबवला
वाढत्या चोर्यांनी घबराट : गोदामाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी : रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
रावेर : तालुक्यातील खानापूर येथे गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 74 हजारांचा डिंक चोरुन नेला. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
डिंक व्यापार्याच्या तक्रारीनुसार गुन्हा
डिंक व्यापारी सय्यद जमील (47, रा.खानका वॉर्ड, शनवारा रोड, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) यांचे खानापूर गावात डिंक साठवण्यासाठी खाजगी गोदाम आहे. शुक्रवार, 10 ते रविार, 12 जून दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने गोदामाचे कुलूप तोडून गोदामातील 74 हजार रुपये किंमतीचा एक टन 540 किलो डडिंक लांबवला. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला सैय्यद जमील यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यां विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.
जळगावातील 24 वर्षीय तृतीयपंथीयाची गळफास घेवून आत्महत्या