भुसावळात रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात पदाधिकार्‍यांचा प्रवेश

रीपाइं जिल्हा सचिवपदी अ‍ॅड.प्रवीण इंगळे तर यावल तालुका संघटकपदी राहुल इंगळे


भुसावळ : शहरातील शासकीय विश्रामगृहात रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात अनेक पदाधिकार्‍यांनी रीपाइं पक्षात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या आदेशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी पक्षात आलेल्या अ‍ॅड.प्रवीण इंगळे यांची री.पा.इं.(आ) जिल्हा सचिवपदी तर कासवा सरपंच राहुल इंगळे यांची यावल तालुका संघटकपदी निवड करण्यात आली तसचे पिंपळगावचे सुरेश जवरे यांची भुसावल युवा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आकाश इंगळे, योगेश इंगळ, योगेश देवर, जितेंद्र वाघ अशा कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यांची कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती
निवडीप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे, लक्ष्मण जाधव, पप्पू सुरडकर, सुनील तायडे, विशाल खरात, सुनील देवरे, शरद सोनवणे, बाळू सोनवणे, प्रकाश तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्याहस्ते नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करू त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. दिलेल्या पदाचा योग्य उपयोग करावा, लोकांची सेवा करावी व पक्ष बळकट करावा, असे आवाहन राजू सूर्यवंशी यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !