फेक अकाऊंट तयार करुन तरुणीची फसवणूक


जळगाव : शहरातील तरुणीचा फोटो वापरुन बनावट अकाऊंट तयार करीत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेक अकाउंटद्वारे तरुणीची फसवणूक
शहरातील एका भागात तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. या तरुणीचा फोटो वापरुन तीचे इन्स्ट्राग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन बदनामी केली. या प्रकरणी तरुणीने तात्काळ सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !