पीआरपीच्या मोर्चाने फैजपूर शहर दणाणले
नुपूर शर्मासह नवीन जिंदल यांच्यावर द्रेशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
फैजपूर : धार्मिक द्वेष भावनेतून वक्तव्य करणार्या नुपूर शर्मासह नवीन जिंदाल यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना देशातून हद्दपार करावे या मागणीसाठी पीआरपीतर्फे व संविधान आर्मीतर्फे शनिवारी सकाळी 11 वाजता सुभाष चौक ते छत्री चौकदरम्यान मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी पदाधिकार्यांनी उभयंतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
झोक्यातून पडल्याने दिड वर्षीय बालिकेचा मृत्यू : एरंडोल तालुक्यातील घटना
यांचा मोर्चात सहभाग
पीआरपीचे प्रदेश उपाध्यक्ष संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे, पीआरपी जळगाव जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष आरीफ शेख पीआरपी जिल्हाध्यक्ष गोपी साळी, संविधान आर्मी महाराष्ट्र नेते व संविधान आर्मी प्रदेशाध्यक्ष राकेश बग्गन, पीआरपी उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.