सावद्यातील श्री स्वामीनारायण मंदिर व सोमवारगिरी मढीला तीर्थक्षेत्राचा दर्जा

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला ः पालकमंत्र्यांची घोषणा


Shri Swaminarayan Temple in Savadya and Somwargiri Madhi As a Pilgrimage Site सावदा  : शहरातील शंभर वर्षापूर्वीची परंपरा असलेले मोठा आड परीसरातील श्री स्वामीनारायण मंदिर व कमल टॉकीज समोरील श्री सोमवारगिरी मढी देवस्थान सोबतच सावदा येथून जवळच असलेल्या जागृत अश्या श्री कालभैरवनाथ महाराज देवस्थानाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा शुक्रवार, 17 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत पालकमंत्री तथा नियोजन मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी जाहीर केला. तीर्थक्षेत्र दर्जामुळे मंदिर विकासासाठी निधी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा झाला आहे.

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले : शिरपूर तालुक्यातील दोघे जागीच ठार 

निर्णयामुळे भाविकांमध्ये समाधान
जळगाव जिल्हा नियोजन मंडळाची बैठक (DPDC Mitting Jalgaon) शुक्रवार, 17 रोजी जळगाव येथे झाली. बैठकीत मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शंभर वर्षापूर्वीची परंपरा असलेले मोठा आड परीसरातील श्री स्वामीनारायण मंदिर व कमल टॉकीज समोरील श्री सोमवारगिरी मढी देवस्थानास क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर केला. यावेळी मुकाईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या निर्णयामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

भाविकांच्या मागणीला आले यश
भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामीनारायण मंदिर व सोमवारगिरी मढी देवस्थान असून येथे दरवर्षी येथे मोठे उत्सव उत्साहात साजरे होतात. भाविक मोठ्या संख्येने दर्शनार्थ येथे येतात. मंदिर परीसराचा विकास व्हावा या अनुषंगाने सोमवारगिरी मढीचे विश्वस्थ कृष्ण गिरीजी महाराज, स्वामीनारायण मंदिराचे धर्मप्रसाद दासजी, कोठारी राजेंद्र प्रसाद दासजी, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, शिवसेना सचिव शरद भारंबे, युवासेना प्रमुख मनीष भंगाळे, भरत नेहते, संघटक निलेश खाचने, शिवाजी भारंबे, बापू भारंबे, अतुल नेमाडे यांनी हे मंदिर तीर्थक्षेत्र पर्यटक स्थळ घोषित करावे, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत लावून धरली. शहरातील खंडेराव संस्थान मंदिरानंतर दोन देवस्थानांना तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या सोबतच येथून जवळच असलेल्या श्री कालभैरवनाथ मंदीर या मंदिरास देखील तीर्थक्षेत्र दर्जा देण्यात आल्याने येथील भविकातून देखील आनंद व्यक्त होत आहे.

झोक्यातून पडल्याने दिड वर्षीय बालिकेचा मृत्यू : एरंडोल तालुक्यातील घटना


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !