कायद्याच्या प्रभावी वापराने भुसावळ शहर गुन्हेगारीमुक्त करा
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे ः वाहतूक शाखेच्या कार्यालयाचे उदघाटन
भुसावळ : शहरातील वाढती गुन्हेगारी व होणारे गुन्हे थोपवावेत व त्यासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी येथे केले. भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पोलिस वसाहतीमध्ये असलेल्या जुन्या डीवायएसपी कार्यालयाच्या जुन्या इमारतीमध्ये शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले.
झोक्यातून पडल्याने दिड वर्षीय बालिकेचा मृत्यू : एरंडोल तालुक्यातील घटना
शहर वाहतूक शाखेला स्वतंत्र कार्यालय
अधीक्षक डॉ.मुंढे म्हणाले की, वाहतूक शाखेला कार्यालय उपलब्ध करून दिले असून त्यांनी नागरीकांच्या मनात विश्वास निर्माण करून जास्तीत-जास्त चांगली सेवा द्यावी. वाहतूक शाखेला स्वतंत्र असे कार्यालय नसल्याने पोलिस लाईनमधील जुन्या डीवायएसपी ऑफिसची इमारत शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासाठी देण्यात आल्याचे ते म्हणाले. अधीक्षकांच्या हस्ते कोनशिलावरण करण्यात आले. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले. शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक यांनी शहरातील वाहतूकीची माहिती अधीक्षक मुंढे यांना दिली. सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक गजानन पडघान, निरीक्षक राहुल गायकवाड, निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह दुय्यम अधिकारी, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक यांनी मानले.
जीमचे उद्घाटन
पोलिस लाईनीमध्येच असलेल्या हॉलमध्ये जिम तयार करण्यात आली आहे. या जिमचे उद्घाटन डॉ.मुंढे यांनी केले. याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, पोलिस बॉइज यांनी जीमचा लाभ घ्यावा, लवकरच जीममध्ये अद्यावत साहित्य दिले जाइॅल. त्याचा उपयोग युवकांनी करावा.