दुसखेडा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


फैजपूर : यावल तालुक्यातील दुसखेडा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्ले. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गावठी कट्ट्याच्या धाकावर धुळ्यात पाणी पुरी विक्रेत्याची दहशत : आरोपी जाळ्यात

फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा
यावल तालुक्यातील दुसखेडा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरुवार, 16 जून रोजी सकाळी 11 वाजता मैत्रीणीकडे जावून येते, असे सांगून ती घराबाहेर पडली. दरम्यान सायंकाळपर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त करत तिचा नातेवाईकांसह मैत्रीणींच्या घरी शोधाशोध केली परंतु ती कुठेही आढळून आली नाही. पीडीत मुलीच्या भावाने फैजपूर पोलिस ठाण्यात येवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याबाबत तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहेत.

कायद्याच्या प्रभावी वापराने भुसावळ शहर गुन्हेगारीमुक्त करा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !