पत्नीसोबतच्या वादानंतर मुलीला विहिरीत फेकले : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


After An Argument With His wife, The Girl Was thrown Into a Well जळगाव : मुलीला विहिरीत फेकून खून करणार्‍या पसार संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काकनबर्डी येथून अटक केली. त्यास कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जितेंद्र उर्फ नाना जंगलू ठाकरे (कराब, ता.भडगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मुलीलाच ढकलले विहिरीत
जितेंद्र ठाकरे याचा पत्नीसोबत वाद झाला व या वादातून त्याने त्याची दोन वर्षाची मुलगीला घेवून जावून विहिरीत फेकून दिले. तिला फेकत असतांना परीसरातील नागरीकांनी पाहिले असता जितेंद्र ठाकरेने विहिरीत उडी घेतली. दरम्यान, नागरीकांनी त्याला विहीरीतून बाहेर काढून भडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान संशयित जितेंद्र ठाकरे हा पसार झाला होता. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अखेर आरोपी जाळ्यात
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पसार झालेला संशयित आरोपी जितेंद्र ठाकरे आल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने काकनबर्डी येथून त्याला अटक केली.

मांदुर्णेतील तरुणाचा शॉकने मृत्यू : वीज कंपनी अभियंत्यांसह वायरमनविरोधात गुन्हा 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !