चोरट्यांच्या पशूधनावर डोळा : पाथरी शिवारातून सव्वा लाखांचे बोकड चोरीला
A goat worth Rs 15 lakh was stolen from Pathri Shivar जळगाव : पाथरी शिवारामधील शेतातील गोठ्यातून सव्वा लाख रुपये किंमतीचे 13 बोकड चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पशूपालकात चोरीने घबराट
जळगाव तालुक्यातील पाथरी येथील अभिमान नारायण धनगर (60) हे वास्तव्यास असून त्यांचे गावालगतच शेत असून त्याठिकाणी गोठा आहे. शुक्रवार, 17 रोजी रात्री 9.30 ते दि. 18 रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरटयांनी त्यांच्या शेतातून एक लाख 30 हजार रुपये किंमतीचे 13 बोकड चोरुन नेले. ही घटना उघडकीस येताच अभिमान धनगर यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय राजेंद्र उगले हे करीत आहे.