पाचोरा तालुक्यातील महिलेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा


पाचोरा : पिंपळगाव तांडा येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्लील चाळे करीत विनयभंग
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथे 26 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार, 19 जून रोजी रात्री एक वाजता सुमारास महिला ही घरात झोपलेली असताना संशयीत आरोपी परशुराम मधुकर पवार याने महिलेजवळ येत अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. याबाबत महिलेने पिंपळगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर आरोपी परशुराम मधुकर पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक पांडुरंग गोरबंजार करीत आहे.

अपघात सत्र कायम : जळगावात भरधाव ट्रालाच्या धडकेने पाळधीतील दुचाकीस्वार ठार 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !