माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या विजयाचा जल्लोष

भुसावळ विभागात फटाक्यांची आतषबाजी करीत पेढ्यांचे वाटप : आमदार खडसेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी


भुसावळ : विधान परीषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे हे विजयी झाल्यानंतर भुसावळसह विभागात राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी पेढ्यांचे वाटप करून फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. याप्रसंगी खडसेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मुक्ताईनगरात फटाक्यांची आतषबाजी
मुक्ताईनगर : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात फटाक्यांची आतषबाजी केली तसेच ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढली. जेसीबीवर चढून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरातील राष्ट्रवादी कार्यालयाजवळ मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे खडसेंच्या विजयाची घोषणा होण्यापूर्वीच शहरात काही ठिकाणी खडसेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आल्याचे दिसून आले.

यावलला बाजार समितीसमोर आतषबाजी
यावल : माजी मंत्री खडसेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी यावल शहरात बाजार समितीसमोर फटाक्यांची आतषबाजी केली. माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, राकेश कोलते, अ‍ॅड.देवकांत पाटील, किशोर माळी, राहुल चौधरी, दिनेश महाजन, अक्षय बोरोले, पराग सराफ, अरुण लोखंडे, एम.बी.तडवी, पवन पाटील, प्रकाश पारधे उपस्थित होते.

भुसावळात जोरदार घोषणाबाजी
भुसावळ : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विजयाची घोषणा होताच भुसावळ शहरातील रजा टॉवर चौकात सोमवारी रात्री 9.30 वाजता कार्यकर्ते एकत्र आले. त्यात शेख पापा शेख कालू, शेख जाकीर पेंटर, शेख इम्रान शेख पापा, शेख वसीम शेख शफी, जोहेब सय्यद, अस्लम शाह मासूम शाह, शेख इम्रान यांचा समावेस होता. या सर्वांनी फटाक्यांची आतषबाजी केली. रस्त्याने ये-जा कणार्‍यांना पेढ्यांचे वाटप देखील करण्यात आले.

सावद्यात राष्ट्रवादीने वाटले पेढे
सावदा : शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकासह गांधी चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष कुशल जावळे, युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष गौरव वानखेडे, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष साईराज वानखेडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर राष्ट्रवादीत फूट पडून भाजप सरकार सत्तेत आले असते !


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !