विधान परीषद निवडणुकीतील यशानंतर भुसावळात भाजपाचा जल्लोष
भुसावळ : विधान परीषदेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रवीण दरेकर श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे व प्रसाद लाड हे निवडून आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज संकुलाजवळ भुसावळातील भाजपा पदाधिकार्यांनी फटाके फोडुन व लाडू वाटप करून जल्लोष केला. यावेळी भाजपा समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.
मंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले : माझ्यासोबत 40 आमदार
यांची होती उपस्थिती
प्रसंगी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, प्रा.दिनेश राठी, सतीश सपकाळे, अजय नागराणी, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, गिरीश पाटील, बिसन गोहर, जयंत माहुरकर, शिशिर जावळे, अनिल पाटील, विशाल जंगले, प्रशांत देवकर, अनुसुचित जाती मोर्चाचे धनराज बाविस्कर, अलका शेळके, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, बेटी बचाव अभियानाच्या अध्यक्षा भारती वैष्णव, गिरीश महाजन, मुकेश पाटील, गुणवंत बोरोले, मंगेश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, ओबीसी मोर्चाचे भावेश चौधरी, किरण मिस्त्री, अनु.जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल तायडे, शंकर शेळके, शेखर धांडे, मुकेश पाटील, गुणवंत बोरोले, प्रा.विलास अवचार, संजय बोचरे, व्यापारी आघाडीचे सागर चौधरी, चेतन सावकारे, गोपीसिंग राजपूत, लखन रणधीर, ईश्वर पवार, विजय पवार व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
