राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकीकडे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना व आघाडी सरकार कोसळण्याच्या शक्यता वर्तवल्या जात असतानाच राज्यपालांना कोरोना झाल्याने आता मंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांच्या पाठीब्यांचे पत्र गोव्यातील राज्यपालांना सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर काही सूत्रांच्या माहितीनुसार पदभार राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे कायम ठेवण्यात येणार आहे.
नाराजीनाट्य : मंत्री एकनाथ शिंदेंना जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तीन आमदारांची साथ
रीलायन्स रुग्णालयात उपचार
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रीलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे टेन्शन वाढलं आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी तब्येत कालपासून खराब झाली होती. मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांना ताप होता. त्यामुळे त्यांनी कोरोना टेस्ट केली असता आता त्यांचा रीपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे गोव्याचे राज्यपाल श्रीधरन यांना कोश्यारी यांचा कार्यभार मिळण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे मुंबई नव्हे तर गोव्यात पाठींब्याचे पत्र घेऊन जाणार असल्याची चर्चा होत आहे.
