Shiv Sena leader Sanjay Raut आघाडी सरकार कोसळणार ? : संजय राऊत यांचे सूचक ट्वीटद्वारे संकेत
Shiv Sena leader Sanjay Raut मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास आता विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू असल्याचे सूचक ट्विट खासदार संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी केल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. संजय राऊत यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरू असून ते परत येतील, असा दावा केला होता. पण आता त्यांनी खळबळजनक ट्विट करुन मोठा ट्विस्ट आणला आहे.
आघाडी सरकार अल्पमतात
मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने आज दिवसभरात सरकार कोसळेल, असा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे.

फार तर सत्ता जाईल : संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut)
एकनाथ शिंदेंसोबत आमचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. आज सकाळी देखील तासभर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना आणि ते आम्हाला सोडणं शक्य नाही. ते कट्टर शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेतच राहतील आणि संपूर्ण आयुष्य शिवसेनेतच काढतील, असा विश्वास संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी व्यक्त केला होता.
मंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले : माझ्यासोबत 40 आमदार
महाविकास आघाडी सरकार कोसळणार ? एकनाथ शिंदे 11 आमदारांसह गुजरातमध्ये
पक्षांतर बंदी कायद्याचा असा आहे निर्णय : एकनाथ शिंदेच्या निर्णयाकडे लक्ष
तर राष्ट्रवादीत फूट पडून भाजप सरकार सत्तेत आले असते !