परीक्षेला जाणार्या पहूरच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू
पहूर : भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पाळधी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात खर्चाने फाट्याजवळ घडला. समाधान देवसिंग परदेशी (23, पहूर पाळधी, ता.जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पहूर गावात शोककळा
समाधान परदेशी हा तरुण सोयगाव येथे परीक्षा देण्यासाठी मंगळवार, 22 जून रोजी सकाळी आठ वाजता दुचाकी (एम.एच.19 बी.एस.235) ने जात असतांना खर्चाने फाट्याजवळ भरधाव वेगाने येणार्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने समाधानचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती युवा सेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील, पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील यांना कळताच आपल्या सहकार्यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन मयत समाधान परदेशी याला ताबडतोब पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सहा महिन्यांपूर्वीच समाधानचे लग्न झाले होते. पाळधी येथे महालक्ष्मी ग्लास अॅल्युमिनीयम वेल्डीग दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन बहिणी असा परीवार आहे.न परदेशी पहुर ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करून आज दुपारी दोन वाजता पाळधी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने पाळधी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
