वाघरेत दोन गटात तुफान धुमश्चकी : दोन्ही गटातील 12 जखमी


पारोळा : तालुक्यातील वाघरे येथे शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात 12 जण जखमी झाले. रविवार, 19 रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली तर जखमी झालेल्यांवर दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवार, 20 जून रोजी हल्ला करण्यात आला.

मारहाणीत हे जखमी
हाणामारीत मल्हारी विक्रम पाटील, सुदाम रमेश पाटील, रोशन पुंडलिक पाटील, सुनील रमेश पाटील, नाना भिकारी पाटील, भाऊसाहेब भिकारी पाटील, रमेश विक्रम पाटील, अनिल मल्हारी पाटील, पुंडलिक विक्रम पाटील, महादेव नानू पाटील, योगेश कृष्णा पाटील, दीपक महादू पाटील, आधार भिकारी पाटील, महादू पाटील, गजेंद्र नाना पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी धुळ्यातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
मारहाणीची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड, प्रवीण पाटील, महेश पाटील, बापू पारधी, किशोर भोई, यांनी रूग्णालयात धाव घेतली. या बाबत कृष्णा भिकारी पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी मनोज मल्हारी पाटील ,अनिल मल्हारी पाटील, सुदाम रमेश पाटील, सुनील पाटील, पुंडलिक विक्रम पाटील, रमेश विक्रम पाटील, मल्हारी विक्रम पाटील व रावसाहेब मगन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आघाडी सरकार कोसळणार ! : संजय राऊत यांचे सूचक ट्वीटद्वारे संकेत


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !