रीक्षा लावण्यावरून भावांमध्ये हाणामारी : परस्परविरोधी गुन्हा
जळगाव : शिरसोली रोडवरील विनोबा नगरात शेजारी राहणार्या दोन भावांसह कुटुंबियांमध्ये रीक्षा लावण्यावरून शिवीगाळ केल्यानंतर मारहाण करण्यात आली. याबाबत दोन भावांवर परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
एव्हढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही : शरद पवारांचा सवाल
किरकोळ वादातून भाऊ भिडले
शिरसोली रोडवरील मोहाडी फाट्याजवळील विनोबा नगरात उमेश लालसिंग परदेशी आणि निखील लालसिंग परदेशी हे दोन्ही भाऊ शेजारी-शेजारी राहतात. सोमवार, 20 जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास निखील परदेशी यांनी त्यांच्या रीक्षा घराच्या गेटसमोर पार्क करून लावली होती. या कारणावरून शेजारी राहणारा भाऊ उमेश परदेशी आणि त्याची पत्नी मेघा उमेश परदेशी यांनी अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली तर प्रतिकार म्हणून निखील परदेशी आणि त्याची पत्नी अपेक्षा निखील परदेशी यांनीदेखील दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत दोन्ही कुटुंबियांनी एमआयडीसी पोलिसात रात्री 10.30 वाजता धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधात चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास हवालदार नितीन पाटील करीत आहे.
