CM Uddhav Thackeray मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले : नाराज आमदारांनी सांगावे मी आता पद सोडतो
CM Uddhav Thackeray मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी पाहता व मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला .मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनेतील नाराज बंडखोरांनी गुजरातमध्ये जावून वक्तव्य केले मात्र त्यांनी समोर यायला हवे होते. मला खुर्चीचा मोह नाही, त्यांनी माझ्या समोर येवून सांगावे मी आत्ताच राजीनामा द्यायला तयार आहे. मला खुर्चीचा मोह नाही. मी बाळासाहेबांचा पूत्र असून हिंदूत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मीच पहिला मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) असल्याचे ते म्हणाले.
भाविक आवाहनाला मंत्री शिंदेंचा प्रतिसाद नाही
मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले असता आपल्याकडे एकूण 46 आमदारांचे समर्थन असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिंदेंनी परत यावे, असे भावनिक आवाहनही केले होते. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असा प्रस्तावही दिला होता. मंगळवारपासून आजपर्यंत राज्यात झालेल्या संपूर्ण राजकीय घडामोडींसंदर्भात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ज्यांनी मी नको त्यांनी फक्त मला येऊन सांगावे, मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार, असे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बंडखोरांना उद्देशून म्हटले आहे.


एव्हढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही : शरद पवारांचा सवाल
मी ज्यांना नको त्यांनी समोर येवून सांगावे
मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) म्हणाले की, शिवसेनेने हिंदूत्वाशी फारकत घेतलेली नाही. ही बाळासाहेबांचीच शिवसेना आहे मात्र ज्यांना मी मुख्यमंत्री पदावर वा शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी मी नको आहे त्यांनी समोर येवून सांगावे, बाहेरील राज्यात जावून बोलण्याची गरज नव्हती, असेही ते म्हणाले. हिंदूत्व आमचा श्वास, शिवसेनेची हिंदूत्वापासून फारकत नाही, स्व.बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम आपण करतोय, असेही मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) म्हणाले.