साकरीत अवैध मद्यविक्री : 24 हजारांचा मद्यसाठा जप्त


भुसावळ : तालुक्यातील साकरी येथे अवैधरीत्या मद्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकास कारवाईचे आदेश दिल्यानंतर महेंद्र आनंदा बोदर (32, साकरी, ता.भुसावळ) यास बुधवारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली तर संशयीताच्या ताब्यातून 23 हजार 775 रुपये किंमतीचे देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात नाईक संकेत अरुण झांबरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार रमण सुरळकर, नाईक यासीन पिंजारी, नाईक संकेत झांबरे आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !